महाराष्ट्र २४ तासचा ई दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मुळात महाराष्ट्र २४ तास हे वेब पोर्टल आहे. www.maharashtra24taas.com हा आमचा वेब पत्ता आहे. या वेबसाईटवर जाऊन आपण महारष्ट्रात घडणार्या घडामोडी तसेच मनोरंनासह विश्लेषण आपण वाचू शकता. त्याच प्रकारे महाराष्ट्र २४ तास ऍण्ड्रॉईड व आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन maharashtra 24 taas असे टाईप केल्यास आपण या ऍपचा आनंद लुटू शकता. रसिकांनी आमच्या या सर्व माध्यमांना भरभरुन प्रतिसाद दिला व थोड्याच काळात महाराष्ट्र २४ तास हे अत्युत्तम वेब पोर्टल बनले. अर्थात याचे श्रेय आमच्या लेखकांना शुभेच्छुकांना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचकांना जाते. कुठलीही कला असो, कितीही चांगला असो, पण रसिकांली दाद नाही दिली तर त्या कलेला काहीच मोल नसतो. त्यामुळे रसिक वाचकांना आम्ही नेहमीच वंदन करतो.
महाराष्ट्र २४ तास पहिल्यांदाच ई दिवाळी अंक आपल्यासमोर सादर करीत आहे. या अंकामध्ये लेख, कविता, मुलाखत, माहिती, विनोद अशा सर्वच साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. तरी हा दिवाळी अंक नुसता करमणुकप्रधान न होता ज्ञानवर्धकही असणार आहे. या अंकातील अनेक लेख व कविता महाराष्ट्र २४ तासच्या वेब पोर्टलवर पूर्व प्रकाशित झालेले आहेत. त्यातील निवडक लेखांचा हा दिवाळी विशेषांक. सांगायला अधिक आनंद होत आहे की आम्ही अनेक नवोदित लेखकांना, कवींना व कलाकारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. तळागाळातील गुणवंतांना त्यांची कला जगभरात प्रसिद्ध करणे व त्यांच्या कलेला मानाचे स्थान प्राप्त करुन देणे हा आमचा यामागचा उद्देश आहे. याआधी आम्ही काव्य स्पर्धा, लेखन स्पर्धा, गणेश सजावट स्पर्धा असे उपक्रम राबवले आहेत व पुढे महाराष्ट्र २४ तास अनेक नवीन व महत्वाचे उपक्रम राबवीणार आहे. महाराष्ट्र तरुणांना एक उत्तम दिशा देण्याचे काम आम्ही करणार आहोत. यामध्ये प्रबोधक संस्थेचे हर्षद माने यांचाही सिंहाचा वाटा असणार आहे. महाराष्ट्र २४ तास हे भविष्यात महाराष्ट्राचा आवाज असेल असे आम्हाला वाटते. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची व शुभाशिर्वादाची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र २४ तासच्या वाटचालीत व या दिवाळी अंकाच्या निर्मितीत अनेकांचे हातभार लागले आहेत. त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. सर्व लेखकांचे, कविंचे व ज्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्या मान्यवरांचे मनस्वी आभार. वाचकांनो, आपल्याला हा अंक कसा वाटला, हे आम्हाला जरुर कळवा.. फोन करा, ईमेल करा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा. आपण दिलेल्या प्रतिक्रियेवर आम्ही नक्कीच विचार करु व आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याचाही प्रयत्न करु. यापुढेही आम्ही असेच साहित्यिक फराळ पुरवत राहू ही शाश्वती आम्ही आपल्याला देतो. धन्यवाद..
ही दिवापली व नूतन वर्ष सर्वांना आनम्दाचे, आरोग्याचे, सुखसमृद्धीचे व साफल्याचे ठरावे या सदिच्छा.. सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
免費玩Maharashtra24Taas Diwali Ank APP玩免費
免費玩Maharashtra24Taas Diwali Ank App
熱門國家 | 系統支援 | 版本 | 費用 | APP評分 | 上架日期 | 更新日期 |
---|---|---|---|---|---|---|
未知 | Android Google Play | 1.2 App下載 | 免費 | 1970-01-01 | 2015-03-11 |